किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर आदळले आहेत.
मीच सर्व काही करू शकतो असे म्हणत तेलंगणात पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत असलेल्या केसीआर यांना काँग्रेसने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात चांगलाच झटका दिला आहे. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने सर्वाधिक लक्ष तेलंगणावर केंद्रित केले होते. मात्र, देशव्यापी नेतृत्वाची स्वप्ने पडलेल्या केसीआर यांना त्याची जाणीव नव्हती. इतकेच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सर्वाधिक शक्ती खर्च केली. तब्बल ७०० गाड्यांचा ताफा घेऊन ‘सिंघम’ शैलीत पंढरपूरला येत केसीआर यांनी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, आता तेलंगणात पराभव झाल्याने विशेष करून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे.
केसीआर यांनी तेलंगणानंतर सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले होते. दैनिकांसह त्यांनी टीव्हींना जाहिराती देत राज्यात दौर्यावर दौरे केले होते. त्यामुळे केसीआर यांच्या झगमटामागे कोणती राजकीय अदृश्य शक्ती काम करीत आहे, याचीच चर्चा रंगली होती.
केसीआर यांचा स्वप्नभंग
पहिल्यांदा देशव्यापी आणि नंतर महाराष्ट्राचे स्वप्न पाहिलेल्या केसीआर यांना तेलंगणात काँग्रेसने जबर हादरा दिला. इतकेच नव्हे, तर केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. बीआरएसला केवळ ३९ जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमने सात जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ८ जागा जिंकत विस्तारास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर, भाजपाचे के. वेंकट रमणा रेड्डी यांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी या दोघांचाही पराभव केला आहे.