Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
हैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
– तेलंगणात काँग्रेसने उधळले स्वप्न हैदराबाद, (०३ डिसेंबर) – केसीआर पार्टीचा अश्वमेध कुणीच रोखू शकणार नाही, या थाटात देश जिंकायला निघालेले के. चंद्रशेखर राव अर्थात् केसीआर स्वतःच्या घरात म्हणजे तेलंगणातच गारद झाले आहेत. केसीआर यांना मागील काही काळापासून पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न पडायला लागले होते. मात्र, काँग्रेसने ते उधळले आहे. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे केसीआर घरातच गारद होतील, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील चेवेल्ला येथील विजयसंकल्प सभेला संबोधित करताना वर्तवले...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
हैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
माधिरा, (२२ नोव्हेंबर) – तेलंगणात काँग्रेसला फक्त २० जागांवरच समाधान मानावे लागणार असून, आपल्याच पक्षाला मोठे बहुमत मिळेल, असा दावा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे प्रमुख तसेच विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केला आहे. राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या माधिरा येथील प्रचारसभेत केसीआर यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. काँग्रेस पक्षात एक डझनापेक्षा अधिक मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत अधिक जागांवर जिंकणार नसून, फक्त २०...
22 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा के. चंद्रशेखर राव यांच्यावर हल्ला, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – २०१४ मध्ये स्थापनेच्या वेळी महसूल अधिशेष असलेले तेलंगणा आता महसुली तुटीचे राज्य बनले आहे आणि त्याला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जबाबदार आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. तेलंगण विधानसभा निवडणुकीतील मलकाजगिरी येथील भाजपचे उमेदवार एन रामचंद्र राव यांच्या सन्मानार्थ आयोजित सभेला संबोधित करताना सीतारामन म्हणाले की, तेलंगणाच्या पुढील दोन ते तीन...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे राज्यात निवडणुकीचे वाभाडे तयार झाले असताना दुसरीकडे बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तिन्ही पक्षांचे दावे जास्त आहेत. एकीकडे सत्ताधारी बीआरएस आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसही बीआरएसला सत्तेतून बेदखल करण्याची तयारी करत आहेत. तेलंगणा राज्याच्या...
4 Nov 2023 / No Comment / Read More »