किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमाधिरा, (२२ नोव्हेंबर) – तेलंगणात काँग्रेसला फक्त २० जागांवरच समाधान मानावे लागणार असून, आपल्याच पक्षाला मोठे बहुमत मिळेल, असा दावा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे प्रमुख तसेच विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केला आहे.
राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या माधिरा येथील प्रचारसभेत केसीआर यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. काँग्रेस पक्षात एक डझनापेक्षा अधिक मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत अधिक जागांवर जिंकणार नसून, फक्त २० जागा किंवा त्यापेक्षाही कमी जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री केसीआर यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुख्यत्वे काँग्रेसवर अनेक आरोप लावले. तेलंगणा राज्याची निर्मिती होण्याआधी २०१४ मध्ये अविभाजित आंध्रप्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला पिण्यासाठी आणि पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध करता आले नाही. केवळ जनतेचा विश्वासघातच केला. यंदा पुन्हा एकदा राज्यात बीआरएस पक्षच सरकार स्थापन करेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, असेही केसीआर म्हणाले.
राज्यातील दलितबांधवांची स्थिती अद्याप तशीच हलाखीची आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बीआरएस सरकारच्या दलित बंधू यासारख्या कल्याणकारी योजना लागू केल्या असत्या तर, त्यांच्या आर्थिक संपन्नेत नक्कीच बदल जाणवला असता, असेही ते म्हणाले. तेलंगणामध्ये येत्या ३० नोव्हेंबरला ११९ मतदारसंघात मतदान होत असून, मतमोजणी ३ डिसेंबरला होईल.