किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे.
भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री आणि त्यांचे पुत्र के. टी. रामा राव, टीपीसीसीचे अध्यक्ष ए. रेवांथ रेड्डी आणि भाजपाचे खासदार बंडी संजयकुमार, डॉ. अरविंद आणि सोयाम बापुराव यांचा समावेश आहे. के. चंद्रशेखर राव गजवेल आणि कामारेड्डी आणि रेवांथ रेड्डी कोडांग आणि कामारेड्डीतून लढत आहेत. भाजपाने गजवाल येथे आ. एटाला राजेंदर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळली.