किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह,
कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार यांसारख्या मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवला आणि जनतेने त्यांचे सरकार उलथवून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. रॅलीत जमलेल्या गर्दीबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, यातून लोकांचा मूड दिसून येतो. २०२६ मध्ये भाजप दोन तृतीयांश बहुमताने राज्यात सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची कामगिरी विधानसभा निवडणुकीतील विजयाची पायाभरणी करेल, असे शाह म्हणाले.
वादग्रस्त सीएए चा संदर्भ देत शाह म्हणाले की, ममता बॅनर्जी याला विरोध करत आहेत, पण त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विरोधी पक्षांच्या या कायद्याला विरोध असताना केंद्र सरकारने अद्याप त्याचे नियम बनवले नसल्याने हा कायदा अद्यापही अधांतरीच आहे. शाह ऐतिहासिक एस्प्लेनेड येथे पक्षाच्या सभेला संबोधित करत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, जी आतापर्यंतची सर्वोच्च आहे.