Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. यापूर्वी ही बैठक रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्रातील महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्याची घोषणा झालेली नाही, असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे....
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ मार्च) – आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे...
2 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन, – विविध पक्षांतील नेत्यांना भाजपात घेण्यासाठी समिती, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या रामललाच्या मंदिरात २२ जानेवारीला होणार्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने भाजपातर्फे राजधानी दिल्लीत आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची पुढील आठवड्यात बैठक होणार असून, हिवाळी अधिवेशनात विस्कळीत वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या निलंबनाबाबत चर्चा होणार आहे. भाजपचे सदस्य सुनील कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील समिती १२ जानेवारी रोजी निलंबित काँग्रेस सदस्य – के जयकुमार, अब्दुल खालेक आणि विजयकुमार विजय वसंत यांच्या तोंडी पुरावे गोळा करण्यासाठी बैठक घेणार आहे. या सदस्यांना १८ डिसेंबर रोजी सभागृहात गंभीर गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून निलंबनाचा सामना करावा...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
– २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची व्यूहरचना, नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची व्यूहरचना ठरविण्यासाठी भाजपाने आपल्या द्विदिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीला तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी असल्यामुळे भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युद्ध पातळीवर कामाला लागावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. भाजपाच्या विस्तारित मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बंदद्वार झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 21st, 2023
– काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. संसद भवनात आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत गांधी म्हणाल्या, आजपर्यंत संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत विरोधी पक्षांच्या खासदारांना कधीच निलंबित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या...
21 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 21st, 2023
– गृहमंत्री अमित शाह यांनी दिली कायद्याची माहिती, नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून जाणार्यांसाठी बातमी आहे. या गंभीर मुद्द्याबाबत सरकारने मोठे पाऊल उचलले असून, नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणार्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत या कायद्याची माहिती दिली आहे....
21 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 11th, 2023
नागपूर, (११ डिसेंबर) – कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल सुनावला असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमासमोर व्यक्त केली. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची एकात्मता राखणारे योग्य पाऊल उचलले होते, ते...
11 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह, कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
– टीम इंडियाच्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये पाठीवर थाप देऊन प्रोत्साहन दिले, अहमदाबाद, (२१ नोव्हेंबर) – विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव झाला. जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये पोहोचले. सामन्यात संघाचा पराभव झाल्यानंतर ते ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तेथे त्याने कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण संघाची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली....
21 Nov 2023 / No Comment / Read More »