किमान तापमान : 28.58° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
25.84°से. - 30.87°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल27.21°से. - 30.97°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची व्यूहरचना,
नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची व्यूहरचना ठरविण्यासाठी भाजपाने आपल्या द्विदिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीला तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी असल्यामुळे भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युद्ध पातळीवर कामाला लागावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
भाजपाच्या विस्तारित मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बंदद्वार झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, आघाडी प्रमुख यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसर्या दिवशीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर कामाला लागावे, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन मोदी यांनी बैठकीत केले. तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब जनेतला डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, या वर्गांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन मोदी यांनी केले. पक्षाची निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बुथ व्यवस्थापनावर जोर देण्यात यावा, भाजपाच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्यांनी बुथ व्यवस्थापनाची जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारावी, अशी सूचना मोदी यांनी या बैठकीत केल्याचे समजते. यासंदर्भात मोदी यांनी मध्यप्रदेश तसेच उत्तरप्रदेशातील उत्कृष्ट बुथ व्यवस्थानाचा संदर्भ दिला. विरोधी पक्ष मोदी सरकारविरुद्ध करीत असलेल्या नकारात्मक प्रचाराला तथ्यांसह सकारात्मक प्रचारातून प्रभावी उत्तर द्यावे, असे आवाहन मोदी यांनी बैठकीत केले. गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, महासचिव विनोद तावडे यांनीही बैठकीला संबोधित केले.