किमान तापमान : 30.57° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.74 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
26.35°से. - 33.99°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.69°से. - 30.46°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.81°से. - 30.45°से.
रविवार, 17 नोव्हेंबर साफ आकाश27.66°से. - 31.1°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.51°से. - 30.68°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.84°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशबंगळुरू, (२३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून तयार झालेली ‘इंडि’ आघाडी ही कोणतीही समान विचारधारा किंवा राजकीय कार्यक्रम नसलेल्या नेत्यांचा समूह आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केला.
हिवाळी अधिवेशनात १४६ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीने देशव्यापी आंदोलन करण्याच्या एक दिवस आधी अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. १३ डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा भेदण्याचे प्रकरण समोर आले, तेव्हापासून इंडिया आघाडी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाची मागणी करीत आहे.
इंडिया आघाडी कुठे आहे, अशी विचारणा करीत अनुराग ठाकूर म्हणाले, ते पंजाबमध्ये संघर्ष करीत आहेत तसेच इतर राज्यांत वाद आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही. ती भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणार्या लोकांचा समूह आहे. संसदेतील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावर ठाकूर म्हणाले की, त्यांना सभापतींनी प्रतिबंधित असलेल्या वर्तनासाठी निलंबित केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी मान्य केले आहे की, ते लोकसभा आणि राज्यसभेत फलक आणणार नाहीत. आम्ही संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला, तेव्हा सभापतींनी सर्वांना विनंती केली होती की, कोणीही कागद फाडून सभापतींकडे भिरकावू नये आणि कोणतेही फलक आणू नयेत, अशी नवीन परंपरा सुरू करावी.