Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
बंगळुरू, (२३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून तयार झालेली ‘इंडि’ आघाडी ही कोणतीही समान विचारधारा किंवा राजकीय कार्यक्रम नसलेल्या नेत्यांचा समूह आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केला. हिवाळी अधिवेशनात १४६ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीने देशव्यापी आंदोलन करण्याच्या एक दिवस आधी अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. १३ डिसेंबर रोजी...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा गौप्यस्फोट, नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – संसदेत गैरवर्तनासाठी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांचे अनेक सहकारी, ‘आम्हालाही सभागृहातून निलंबित करण्यात यावे,’ या विनंतीसह आमच्याकडे आले होते. त्यांना निलंबित करण्याची आमची मुळीच इच्छा नव्हती, असा गौप्यस्फोट संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाकला. केवळ गैरवर्तन करणार्या सदस्यांनाच सभागृहाने निलंबित केले होते. मात्र, जेव्हा इतर राजकीय पक्षांचे सदस्यही निलंबनाच्या विनंतीसह आमच्याकडे आले, तेव्हा आम्हाला...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 19th, 2023
– १४१ खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, नवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या गदारोळात आतापर्यंत एकूण १४१ खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आज एकट्या लोकसभेतील ४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारपर्यंत दोन्ही सभागृहातील ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आलेले नूतन खासदार डॉ. त्यात कार्ती चिदंबरम, शशी थरूर, दानिश अली, डिंपल यादव...
19 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – शिवसेना शिंदे गट अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आणखी वेळ दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला तीन आठवड्यांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत दिली. मात्र १० जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय देण्यास सांगण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी संसद भवनात पोहोचले. येथे त्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, उपाध्यक्ष जगदीप धनखर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते. यादरम्यान पीए मामोदी यांनी संसद भवनावरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– हिवाळी अधिवेशनात भाजप पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, – सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. गेल्या बुधवारी, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि केंद्र सरकारने सादर केलेले जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक, २०२३ यावर लोकसभेत चर्चा झाली. या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप पुन्हा एकदा संसदेत मोठा निर्णय...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– फडणवीसांच्या उत्तराने वडेट्टीवारांच्या आरोपाची धार बोथट, नागपूर, (०८ डिसेंबर) – राज्यातील १२०० दुष्काळी महसूल मंडळांतील शेतकर्यांना राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाची धार बोथट केली. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभेत फेटाळण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला वंदेमातरम आणि राज्यगीताने सुरुवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
– संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सनातनचा मुद्दा, नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत भाजपने उदयनिधी स्टॅलिन यांना राज्य सरकारकडून बडतर्फ करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. द्रमुक नेत्याने सनातन आणि हिंदू धर्माविरोधात द्वेषपूर्ण भाषण दिले आहे. जीव्हीएल नरसिंह राव यांनी भारत आघाडीवरही निशाणा...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधकांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना सोमवारी लगावला. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांचे निकाल रविवारी हाती आले. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे,...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
– २२ डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज, नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारच्या वतीने २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते. मात्र, यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला असल्याने ती एक दिवस आधीच घेतली जात आहे. या अधिवेशनात...
28 Nov 2023 / No Comment / Read More »