किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा गौप्यस्फोट,
नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – संसदेत गैरवर्तनासाठी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांचे अनेक सहकारी, ‘आम्हालाही सभागृहातून निलंबित करण्यात यावे,’ या विनंतीसह आमच्याकडे आले होते. त्यांना निलंबित करण्याची आमची मुळीच इच्छा नव्हती, असा गौप्यस्फोट संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाकला.
केवळ गैरवर्तन करणार्या सदस्यांनाच सभागृहाने निलंबित केले होते. मात्र, जेव्हा इतर राजकीय पक्षांचे सदस्यही निलंबनाच्या विनंतीसह आमच्याकडे आले, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले, असे प्रल्हाद जोशी यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत संसदीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील होते. याचवेळी जोशी यांनी संसदेत नुकत्याच पारित झालेल्या तीन नव्या फौजदारी विधेयकांवरही मत मांडले. या नव्या कायद्याच्या मसुद्यात काही त्रुटी असतील, असे विरोधकांना वाटत असेल तर, ते न्यायालयात जाऊ शकतात, असे ते म्हणाले.
काही खासदारांना निलंबित करण्यापूर्वी दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकार्यांनी त्यांना शांततेत सभागृह चालू देण्याची विनंती केली होती. कुणालाही सभागृहातून निलंबित करण्याची इच्छा नाही, असे देखील सांगण्यात आले होते. असे असतानाही अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन काही जणांनी गोंधळ घातला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यानंतर त्यांचे अन्य सहकारी आमच्याकडे आले आणि आमच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा आग‘ह करू लागले.
मात्र, आम्ही तसे न केल्याने या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे नाईलाजाने त्यांना निलंबित करण्यात आले. काँगे‘स स्वत:च्या फायद्यासाठी किती खालचा स्तर गाठू शकते, हेच यावरून दिसून येते, असा जोरदार टोला जोशी आणि मेघवाल यांनी हाणला. नुकत्याच संस्थगित करण्यात आलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकूण १४६ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. यात लोकसभेतील १०० आणि राज्यसभेतील ४६ सदस्यांचा समावेश आहे. अधिवेशन आटोपल्यामुळे आता त्यांचा निलंबनाचा काळही संपला आहे.