किमान तापमान : 26.74° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.87°से. - 29.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल– २२ डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज,
नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारच्या वतीने २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते. मात्र, यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला असल्याने ती एक दिवस आधीच घेतली जात आहे. या अधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्याची सरकारला इच्छा असली, तरी विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम अधिवेशनावर दिसून येईल.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील ‘कॅश फॉर क्वेरी’ आरोपांवरील अहवाल आचार समिती अधिवेशनादरम्यान लोकसभेत सादर करेल. समितीने केलेली हकालपट्टीची शिफारस लागू करण्यापूर्वी समितीचा अहवाल लोकसभेला स्वीकारावा लागेल. भादंवि आणि सीआरपीसी कायदा बदलू पाहणारी तीन महत्त्वाची विधेयके विचारात घेतली जातील. याबाबत गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीने अलिकडेच तीन अहवाल स्वीकारले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आणखी एक महत्त्वपूर्ण विधेयक संसदेत प्रलंबित आहे.