किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२७ नोव्हेंबर) – लष्कराची ताकद लवकरच आणखी वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर रोजी संरक्षण खरेदी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत लष्करासाठी १४० अटॅक हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी दिली जाऊ शकते. हा करार ४५,००० कोटी रुपयांचा असेल. लष्कराला ९० हेलिकॉप्टर आणि हवाई दलाला ५५ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हे हेलिकॉप्टर एचएएलने बनवले असून लष्कराच्या आवश्यकतेनुसार ते तयार करण्यात आले आहे. हे वाळवंटापासून सियाचीन आणि पूर्व लडाखपर्यंत कार्य करू शकते.
प्रचंड असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. हे एकमेव अटॅक हेलिकॉप्टर आहे, जे १६४०० फुटांवर उतरू आणि टेक ऑफ करू शकते. हे ५० फुटांपेक्षा जास्त लांब आणि सुमारे १५ फूट उंच आहे. हेलिकॉप्टर ५.८ टन वजनाची शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांसह उड्डाण करू शकते. त्याचा वेग ताशी २६८ किमी आहे. यात दोन इंजिन आणि दोन पायलट आहेत. प्रचंड हेलिकॉप्टर २० एमएम कॅलिबर गन आणि ७० एमएम रॉकेटने सुसज्ज आहे. हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. जे शत्रूचे रणगाडे, बंकर आणि ड्रोन देखील नष्ट करू शकतात. हे हेलिकॉप्टर पुढील तीन-चार दशकांतील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.