किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– फडणवीसांच्या उत्तराने वडेट्टीवारांच्या आरोपाची धार बोथट,
नागपूर, (०८ डिसेंबर) – राज्यातील १२०० दुष्काळी महसूल मंडळांतील शेतकर्यांना राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाची धार बोथट केली. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभेत फेटाळण्यात आला.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला वंदेमातरम आणि राज्यगीताने सुरुवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सहकार मंत्र्यांनी काही अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले, तर काही विधेयके सभागृहात मांडण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी बोलण्याची परवानगी नाकारली. नंतर विविध विभागांच्या पुरवणी मागण्याही सभागृहात मांडण्यात आल्या. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अवकाळी आणि गारपिटीने ग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारने मदत द्यावी, यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला.
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २२ जिल्ह्यांमधील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले असून, संत्रा, कापूस, कांदा या पिकांसह धानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांना ताबडतोब मदत करावी. राज्य सरकारने यापूर्वी राज्यातील ४० तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. या तालुक्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे. सरकारने १२०० महसूल मंडळांची दुष्काळसदृश म्हणून घोषणा केली. या टंचाईसदृश गावांना सरकार काय मदत देणार आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. राज्य सरकारने अन्य मंडळांना ताबडतोब मदत जाहीर करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. याबाबत स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली.