किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधकांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना सोमवारी लगावला.
लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांचे निकाल रविवारी हाती आले. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे, असे नरेंद्र मोदी माध्यमांशी बोलताना म्हणाले. सध्याच्या निवडणूक निकालांच्या आधारे म्हटले तर, विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांनी पराभवाचा राग काढण्याचे नियोजन करण्याऐवजी या पराभवातून धडा घेत पुढे जावे. गेल्या नऊ वर्षांतील नकारात्मकतेचा कल सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे गेले, तर देशाची दिशा बदलेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
चार निकाल उत्साहवर्धक
रविवारी चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. हे अतिशय उत्साहवर्धक निकाल आहेत. सर्वसामान्यांचे कल्याण आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्यांसाठी चार राज्यांतील निवडणूक निकाल प्रोत्साहन देणारे असल्याचे मोदी यांनी सांगितले.
विधेयकांवर सखोल चर्चा करावी
संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. लोकांच्या आशा-आकांक्षांसाठी आणि विकसित भारताचा पाया बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आम्ही नेहमीच सहकार्याची विनंती आणि अपेक्षा करतो. मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो की, त्यांनी जास्तीत जास्त तयारी करून यावे आणि सभागृहात जी काही विधेयके मांडली जातील, त्यावर सखोल चर्चा करावी, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
विरोधकांना सल्ला
नकारात्मकता सोडा, सकारात्मता स्वीकारा, सुशासन हीच सत्तेची प्रथा, लोककल्याण हाच मंत्र, पारदर्शकता हीच खरी ताकद आहे.