किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– एनडीआरएफ तैनात,
चेन्नई, (०४ डिसेंबर) – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाने सोमवारी तामिळनाडूला जोरदार तडाखा दिला. सकाळपासून चेन्नई आणि अन्य भागांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या चक्रीवादळाचा तडाखा आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीलाही बसणार आहे.
चेन्नई शहरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पाणी साचले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. १५ लोकांना वाचविण्यात एनडीआरएफला यश मिळाले. मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचले असून सकाळची विमानसेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली. काही भागांत अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या असल्याचे दृश्य दिसले. चेन्नईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात दोन जणांचा मृत्यू झाला.
पुडुचेरी किनारपट्टीलगत कलम १४४
मिचॉन्ग पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्रप्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुडुचेरीच्या सागरी किनार्याजवळ प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे.
१४४ रेल्वेगाड्या रद्द
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सतत संपर्कात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले होते. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने १४४ गाड्या रद्द केल्या आहेत.
बंगळुरूला वळवली ३३ विमाने
चक्रीवादळाचा फटका लक्षात घेता चेन्नई विमानतळावर उतरणारे ३३ विमाने बंगळुरू विमानतळाकडे वळवण्यात आली. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशला बसण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे, तर चेन्नईला येणारी काही विमान रद्द करण्यात आली.