Posted by वृत्तभारती
Wednesday, June 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जुन) – संसदेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार असल्याचे सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितले. लोकसभेचे अधिवेशन २४ जूनला सुरू होऊन ३ जुलैपर्यंत चालेल, तर राज्यसभेचे अधिवेशन २७ जूनला सुरू होऊन ३ जुलैला संपेल, असे ते म्हणाले. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक, राष्ट्रपतींचे अभिभाषण तसेच त्यावरील चर्चेसाठी २४ जूनपासून बोलवण्यात आले असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. २४ आणि २५...
12 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – सुरक्षाविषयक त्रुटीच्या मुद्यावरून आज लागोपाठ दुसर्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. लोकसभेत सभागृहाचे कामकाज आधी एकदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पीठासीन सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळाची पुनरावत्ती झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले, – संसद भवनाच्या सुरक्षेत दोन त्रुटी, नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणार्या संसद भवनाच्या सुरक्षेत दोन त्रुटी राहिल्याची बातमी आज समोर आली आहे. पहिल्या प्रकरणात, संसदेबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते आणि दुसरे प्रकरण लोकसभेच्या कामकाजादरम्यानचे आहे. बुधवारी सकाळी संसदेबाहेर काही लोकांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेत गुंतलेल्या दिल्ली पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांमध्ये एक महिला आणि...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधकांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना सोमवारी लगावला. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांचे निकाल रविवारी हाती आले. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे,...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर या दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होईल, असा अंदाज होता. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपूर्वी ते पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जात होते. पाच राज्यांतील मतमोजणीनंतर म्हणजे ४ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे. आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याची जागा घेणारी तीन प्रमुख विधेयके या अधिवेशनात विचारात...
11 Nov 2023 / No Comment / Read More »