किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 27.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.58° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – सुरक्षाविषयक त्रुटीच्या मुद्यावरून आज लागोपाठ दुसर्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. लोकसभेत सभागृहाचे कामकाज आधी एकदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
आज सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पीठासीन सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळाची पुनरावत्ती झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
राज्यसभेतही गदारोळ
लोकसभेतील सुरक्षाविषयक त्रुटीच्या घटनेवर चर्चा करावी तसेच या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे, या मागणीवरून लागोपाठ दुसर्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. आज सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच अध्यक्ष जगदीप धनकड यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून घेतली. सभागृहाचे कामकाज स्थगित करून १३ डिसेंबरच्या लोकसभेतील घटनेवर चर्चा करण्याची मागणी करणार्या नियम २६७ नुसार २३ सूचना आपल्याकडे आपल्या आहेत. या मुद्यावर मी गुरुवारी सभागृहात सविस्तर माहिती दिली होती. उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, ती तार्किक शेवटाला नेली जाईल, त्यामुळे स्थगनप्रस्तावाच्या सूचना स्वीकारण्यात काही औचित्य नाही. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपल्या जागेवर उभे होत मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली. याचवेळी आपचे राघव चड्ढा इशार्याने काही बोलू लागले. त्यावर तुम्ही इशारे न करता तोंडाने बोला. सभागृहातील आचरणाबद्दल तुम्हाला आधी दोषी ठरवण्यात आले आहे, त्यामुळे तुम्ही सभागृहातील मर्यांदाचे पालत करा, असा निर्देश धनकड यांनी त्यांना दिले.
याच गोंधळात सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी कर्नाटकमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी शांत राहावे, सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन धनकड करीत होते, पण गोंधळ थांबत नव्हता. सभागृहात निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पीयूष गोयल, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच अन्य पक्षांच्या गटनेत्यांनी आपल्या दालनात यावे, असे आवाहन करताना धनकड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केले. तथापि, त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने त्यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.