किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू,
पणजी, (१५ डिसेंबर) – मानवाला अंतराळात पाठविणार्या गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी जोरात सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी भारताला एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमची (ईसीएलएसएस) गरज होती. इस्त्रोने इतर देशांकडे हे तंत्रज्ञान मागितले, पण त्यांनी नकार दिला.
आता इस्रोने स्वतःच तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मनोहर पर्रीरकर विज्ञान महोत्सवात सांगितले की, आपल्याजवळ एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टिम विकसित करण्याचा कुठलाही अनुभव नाही. आपण केवळ रॉकेट आणि सॅटेलाईट बनवतो. आम्ही असा विचार केला होता की, हे तंत्रज्ञान आपण इतर देशांकडून घेऊ; मात्र पण कोणताही देश आपल्याला हे तंत्रज्ञान द्यायला तयार नाही. त्यामुळे आता एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाइफ सपोर्ट सिस्टिम आपल्याच देशात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही भारतात उपलब्ध ज्ञान आणि उद्योगांचा वापर करणार आहोत.