किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर या दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होईल, असा अंदाज होता. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपूर्वी ते पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जात होते. पाच राज्यांतील मतमोजणीनंतर म्हणजे ४ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे. आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याची जागा घेणारी तीन प्रमुख विधेयके या अधिवेशनात विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. गृहनिर्माणविषयक स्थायी समितीने याबाबतचे तीन अहवाल स्वीकारले.
हिवाळी अधिवेशन सहसा नोव्हेंबरच्या तिस्या आठवड्यात सुरू होते आणि २५ डिसेंबरपूर्वी संपते. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे मोठे विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. विरोधी पक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह सरकारने धरला नाही. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची पदे कॅबिनेट सचिव स्तरावर करायची आहेत. सध्या त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष आहे.