किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले,
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे ११, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे प्रत्येकी ९, मुस्लिम लीगचे २ तर जदय आणि आरएसपीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. यातील ३० खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्यात आले तरण तिघांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात आले.
लोकसभेतील सुरक्षाविषयक त्रुटीच्या मुद्यावरून गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे तसेच सभागृहात चर्चा करावी, अशी काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांची मागणी होती. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आक्रमक होत विरोधी सदस्यांनी हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्य धाव घेत घोषणाबाजी केली. सर्वपक्षीय बैठकीत कोणीही पोस्टर्स घेऊन वेलमध्ये येऊ नये, यावर एकमत झाले होते. सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करायला तयार आहे, असे स्पष्ट करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अनेक महत्त्वाच्या विधेयकावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्यामुळे सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही. सदस्यांनी आपल्या जागेवर जावे, प्रश्नोत्तराचा तास चालू द्यावा, असे आवाहन सभापती ओम बिर्ला करीत होते. सदस्य प्रतिसाद देत नव्हते. सभागृहातील गोंधळ आणि घोषणाबाजी थांबत नसल्यामुळे बिर्ला यांनी कामकाज १२ वाजपेर्यंत स्थगित केले.
कामकाज पुन्हा सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुकच्या सदस्यांनी पुन्हा हातात पोस्टर्स घेत वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी केली. सभागृहात पोस्टर्स आणत विरोधी पक्षांचे सदस्य त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यास भाग पाडत आहे, सदस्यांनी आपल्या जागेवर जावे आणि आम्हाला कारवाई करण्यास बाध्य करू नये, असे आवाहन पिठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी केले. मात्र सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ कायम होता. अनेक सदस्य राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी बसतात, त्या जागेत आले. तीन सदस्यांनी हातात पोस्टर्स घेऊन अध्यक्षांच्या आसनाजवळ धाव घेत घोषणाबाजी केली. राजेंद्र अग्रवाल यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांची नावे पुकारली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या ३३ सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो सभागृहाने आवाजी मतदानाने पारित केला. अब्दुल खालिक. विजय वसंत आणि के. जयकुमार या तीन सदस्यांना निलंबित करून त्यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले.
निलंबित सदस्य
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आययुएमएल, जदयू आणि आयएसपीच्या सदस्यांचा समावेश आहे. यात अधीररंजन चौधरी, गौरव गोगोई, एंटो अँटोनी, के. मुरलीधरन्, के. सुरेश, अमरसिंह, राजमोहन उन्नीथन्, एस. तिरुनवुक्करसर, विजयकुमार वसंथ, डॉ. के. जयकुमार, अब्दुल खालिक (सर्व काँगे्रस), कल्याण बॅनर्जी, सौगत रॉय, शताब्दी रॉय, अपरुपा पोद्दार, प्रसुन बॅनर्जी, असितकुमार मल, प्रतिमा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल (सर्व तृणमूल काँग्रेस), ए. राजा, दयानिधी मारन, टी. आर. बालू, गणेशन सेल्वम, सीएन अण्णादुराई, टी. सुमती, कलानिधी विरास्वामी, एस. एस. पलानिमनिक्कम्, रामलिंगम सेल्लापेरुमल (सर्व द्रमुक), मुस्लिम लीगचे ई.टी. मोहम्मद बशीर, कणि के. नवास तसेच आरएसपी एन.के. प्रेमचंद्रन् व जदयूचे कौशलेंद्रकुमार यांचा समावेश आहे.