Posted by वृत्तभारती
Tuesday, January 9th, 2024
लखनौ, (०९ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार असल्याच्या निमित्ताने राजकीय घडामोडी आणि दावे-प्रतिदाव्यांना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधान करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. अचानकच त्यांना देशातील मागास, दलित आणि अल्पसंख्यकांची आठवण झाली आहे, हे विशेष ! कोणाचा असेल कोणता देव तर असो, आमचा देव तर पीडीए आहे, असे म्हणून अखिलेश यादव यांनी २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावर प्रतिक्रीया दिली आहे....
9 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
कोलकाता, (१३ डिसेंबर) – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदारासह अनेक व्यावसायिकांच्या निवासस्थानांवर बुधवारी सकाळी आयकर अधिकार्यांनी छापे टाकले, असे एका अधिकार्याने सांगितले. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिकांनी कर भरला नाही, या कारणास्तव आसनसोल, दुर्गापूर आणि राणीगंज भागात छापेमारीची कारवाई करण्यात आली. आमचे अधिकारी काल दुर्गापूरला पोहोचले होते आणि बुधवारी पहाटेपासून या व्यावसायिकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यास सुरुवात केली. ते बँक स्टेटमेंट आणि इतर मालमत्तेच्या तपशिलांसह विविध कागदपत्रे शोधत आहेत, असे...
13 Dec 2023 / No Comment / Read More »