किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशलखनौ, (०९ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार असल्याच्या निमित्ताने राजकीय घडामोडी आणि दावे-प्रतिदाव्यांना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधान करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. अचानकच त्यांना देशातील मागास, दलित आणि अल्पसंख्यकांची आठवण झाली आहे, हे विशेष !
कोणाचा असेल कोणता देव तर असो, आमचा देव तर पीडीए आहे, असे म्हणून अखिलेश यादव यांनी २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावर प्रतिक्रीया दिली आहे. त्यांच्या मते, पीडीएचा अर्थ पिछडा, दलित आणि अल्पसंख्यक आहेत. आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने, पीडीए हाच अखिलेश यादव यांचा फोकस आहे, हे विशेष! राम मंदीराच्या आयोजनाला मिळत असलेले दैदीप्यमान यश, भारतीयांचा उदंड प्रतिसाद यामुळे अखलेश यादव संत्रस्त झाल्याचे दिसत आहे.
एकीकडे इंडी अलायन्सच्या बैठकींमध्ये काहीही निष्पन्न न निघणे आणि बसपा-तृणमूल काँग्रेसने घेतलेली स्वतंत्र भूमिका यामुळे समाजवादी पार्टीचाही निर्णय अधांतरीच आहे. या अलायन्समधील दहा पक्षांची तोंडं दहा दिशांना झाल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहीलेला नाही. अशावेळी, राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लक्ष्य करून भाजपा आणि पर्यायाने मोदी सरकारवर टीका करणे, एवढेच सपाचे उद्दीष्ट राहीले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.