किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी दिली माहिती,
अयोध्या, (१८ डिसेंबर) – अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी राममंदिर खुले केले जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी दिली.
राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सर्व ट्रस्टी उपस्थित राहणार आहेत. मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशभरातून नागरिक मोठ्या संख्येत अयोध्येत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध राज्यांतील नागरिकांसाठी वेगवेगळे दिवस निश्चित करण्यात येणार आहे, असे चंपत राय यांनी सांगितले. राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी परिसरात विशेष टेंट सिटी उभारण्यात आली आहे. वाढत्या थंडीपासून ऊब मिळावी म्हणून तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अयोध्येत येणाऱ्या साधू-संत आणि सामान्य भाविकांसाठी या सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती चंपत राय यांनी दिली.
मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात अयोध्येत मोठ्या प्रमाणात पाहुण्याची गर्दी होणार आहे. या काळात त्यांना मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या नको, यासाठी काही टेलिकॉम कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे, असे चंपत राय म्हणाले.