किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस,
मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी, मजूर आणि बेजरोजगार अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी नागपूर अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात आली आहे.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणार्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.