किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– शिवसेनेचे वकील महेश जेठमलानींच्या दाव्याने नवे वळण,
मुंबई, (२९ नोव्हेंबर) – अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे ठराव तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप करताना, शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महेश जेठमलानी यांनी केली. यावेळी देखील प्रभू यांना जेठमलानींनी सळो की पळो करून सोडले. ऑन रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्डवर आहे… अशी उत्तरे देताना प्रभू दिसले. जनू प्रभू ही दोनच उत्तर पाठांतर करून आले आहेत की काय, अशी अवस्था दिसली.
शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पदच नाही. आमदारांनी नियुक्त केले नसते तर, उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करू शकले नसते. दिलीप लांडेंची ठरावरील स्वाक्षरी आणि उपस्थितीची स्वाक्षरी वेगवेगळी का, अशा प्रश्नांच्या भडीमारानंतर सुनील प्रभू पुरते गोंधळलेले होते. त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हस्तक्षेप करीत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचा युक्तिवाद कामत यांनी केला. परंतु, जेठमलानी यांनी त्यांचा आक्षेप खोडून काढला. त्यांनी म्हटले की, हा निर्णय निवडणूक आयोगाने कागदपत्र तपासणी आणि सुनावणीत दिला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने अपील केले असले, तरी त्यास कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असे महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कामत यांना गप्प बसावे लागले. एकूणच काय तर, आज पुन्हा सुनील प्रभू यांची चांगलीच गोची झाली. आता बुधवारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.