किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– शिंदे सरकारने मागवली भाषणाची सीडी,
मुंबई, (२९ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवण्यात आली असून, त्यावर कायदेशीर मत घेतले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. जी व्यक्ती राज्यात शेतकर्यांची मदत करीत नाही, दुसर्या राज्यात दुसर्या पक्षाच्या प्रचाराला जाते, अशी व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर जी कारवाई केली होती, तशीच कारवाई उद्धव ठाकरे यांच्यावर करणार असल्याचे संकेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मंगळवारी दिले.
शंभुराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला आहे. मी त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेऊ. ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काय केले होते, हे सर्वांनी पाहिले होते. याआधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असा शब्दप्रयोग केला होता. त्यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली, तीच भूमिका आम्हाला घेणे शक्य आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.