किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.69°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– अजित पवार गटाचा पलटवार,
पुणे, (२९ नोव्हेंबर) – मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले होते. माझे सरकार राहिले असते तर मराठा आरक्षणही कायम राहिले असते, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या अजित पवार गटाने मंगळवारी जोरदार पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असे उत्तर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माझे सरकार पाडले होते. असे झाले नसते तर, आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवले असते. आम्ही दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपाऐवजी आमचेच सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला असता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा आतापर्यंतचा समज होता. त्यांना हल्ली विनोद का सुचतो, ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय, हे माहिती नाही, असा चिमटा सुनील तटकरे यांनी काढला. पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊनच पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, मग अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडीची लय बिघडली. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, असा घणाघात सुनील तटकरे यांनी केला.