किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सुनील प्रभू पुन्हा गोंधळले,
मुंबई, (३० नोव्हेंबर) – सुरुवातीला आमदारांना ई-मेलद्वारे पत्र पाठविल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी उलट तपासणीवेळी ई-मेल नव्हे तर, पत्र पाठविल्याचे सांगताना तसेच या पत्रात काय लिहिले आहे, याबाबत आठवत नसल्याचे सांगताना दिसले. मुळात शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रावरून प्रश्नांची सरबत्ती करीत चांगलेच घेरले असता प्रभू अडखळलेले, गोंधळलेले दिसले.
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची महेश जेठमलानी यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे उलट तपासणी सुरू आहे. आतापर्यंतच्या सुनावणीत जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना एक ना अनेक प्रश्न विचारत चांगलेच अडचणीत आणले. परत बुधवारच्या सुनावणीतही जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना मु‘यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्राबाबत विचारले. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ५० व्या परिच्छेदात जोडलेल्या एका पत्राबाबत प्रश्न विचारले असता, काही प्रश्नांवर सुनील प्रभू अडखळले तर, काही प्रश्नांवर उत्तर देताना नीट लक्षात नसल्याचे सांगितले.
जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना विचारले की, हे पत्र तुम्हीच लिहिले आहे का? इंग‘जीत का लिहिले, स्वाक्षरी तुमचीच आहे का, अशा अनेक प्रश्नांचा जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर भडीमार केला. यावेळी जेठमलानी यांनी तुम्ही पाठवलेले पत्र एकनाथ शिंदे यांना मिळाले नसल्याचा युक्तिवादही केला. यानंतर माध्यमांशी बोलताना जेठमलानी यांनी माहिती दिली की, सुरुवातीला ई-मेल आहे, असे सांगितले गेले, नंतर एक पत्र असल्याचे समोर आले. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना २२ तारखेला पत्र पाठवले होते.
आज शिवसेना आमदारांची उलटतपासणी
गुरुवारी सुनील प्रभू यांची उलट तपासणी संपल्यानंतर लगेच शिवसेनेच्या आमदारांची उलटतपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.