किमान तापमान : 26.82° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
24.56°से. - 29.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.74°से. - 27.77°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 28.69°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.61°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.44°से. - 28.39°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.18°से. - 28.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल– १४१ खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले,
नवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या गदारोळात आतापर्यंत एकूण १४१ खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आज एकट्या लोकसभेतील ४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारपर्यंत दोन्ही सभागृहातील ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आलेले नूतन खासदार डॉ. त्यात कार्ती चिदंबरम, शशी थरूर, दानिश अली, डिंपल यादव आणि सुप्रिया सुळे यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या विधानाच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. निलंबित खासदारांनी संसद भवनाच्या मकर गेटवर निदर्शने केली.
शरद पवार संतापले
हिवाळी अधिवेशनादरम्यान एक किंवा दोन नाही तर, एकूण १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. एका टीव्ही चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ’इंडि आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. एका टीव्ही चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
शरद पवार यांची प्रतिक्रिया…
गॅलरीतून सभागृहात उडी मारणं, प्रवेश करणं, गॅस सोडायचं प्रयत्न करणं यापेक्षा गंभीर गंभीर गोष्टी याआधी झालेल्या नाहीत. विरोधकांनी फक्त हे लोक कोण होते, यामागे कोणती यंत्रणा, शक्ती आहे याची माहिती गृहमंत्र्यांनी द्यावी अशी एकच मागणी केली आहे. पण ती माहिती सभागृहात न देण्याची भूमिका घेतली गेली. सभागृहाच्या बाहेर बोललं जातं. पण जिथे हा प्रकार घडला तिथे माहिती देणार नाही अशा प्रकारचं वर्तन सत्ताधारी पक्षाचं आहे. त्यात बदल करावा आणि माहिती द्यावी अशी आग्रही मागणी केली आणि त्यामुळेच खासदारांनी बडतर्फ केलं. अशा कारणांसाठी अशी कारवाई याआधी झालेली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.