किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास,
नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे आणि उद्योग तज्ज्ञांपासून ते सरकारपर्यंत सर्वांना विश्वास आहे की, येणारा काळ आणखी चांगला असेल. २०३० पर्यंत भारतात दरवर्षी सुमारे १ कोटी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होईल आणि यातून सुमारे ५ कोटी रोजगार निर्माण होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे सुरू असलेल्या ईव्ही एक्स्पो-२०२३ मध्ये ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, आज भारत जगातील ३० टक्के जीवाश्म इंधन वापरतो आणि आपले सर्वाधिक अवलंबित्व आयातीवर आहे. आम्ही केवळ पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर अंदाजे १६ लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. हे दुर्दैवी आहे की, देशाच्या परिवहन क्षेत्रातील गरजांपैकी ८५ टक्के गरजा केवळ आयात केलेल्या जीवाश्म इंधनाद्वारे पूर्ण केल्या जातात.
अमेरिका आणि चीननंतर भारत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ आहे. सध्या वाहन उद्योग सुमारे १२.५ लाख कोटी रुपयांचा आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. डिझेल इंजिनवर चालणारी वाहने प्रदूषणाचे मुख्य कारण आहेत आणि पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. आम्ही वाहतूक क्षेत्राला डीकार्बोनाईज करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करीत आहोत, या प्रयत्नात कमी उत्सर्जन करणारी वाहतूक जसे की इलेक्ट्रिक वाहने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इलेक्ट्रिक वाहने वाहतुकीसाठी सर्वात योग्य आणि सुरक्षित आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.