किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप,
नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. संसद भवनात आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत गांधी म्हणाल्या, आजपर्यंत संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत विरोधी पक्षांच्या खासदारांना कधीच निलंबित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची न्याय मागणी करणार्या सदस्यांना निलंबित करण्यात आले. एवढेच नाही तर देशातील लोकशाही नष्ट करीत सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करीत असल्याचे यातून दिसून येते.
१३ डिसेंबरला लोकसभेत जे घडले, ते अक्षम्य होते, योग्य ठरवता येणारे नव्हते. याप्रकरणी पंतप्रधान मोदी बोलले, पण ते सभागृहाबाहेर. यावरून देशाची संसद आणि लोकांबद्दल त्यांची उपेक्षेची भावना दिसून येते. भाजपा आज विरोधी पक्षात असता, तर त्यांची या मुद्यावर कोणती भूमिका राहिली असती, असे सोनिया गांधी म्हणाल्या. संसदेच्या अधिवेशनात जम्मू-काश्मीरबाबत काही विधेयके पारित करण्यात आली, पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या महान देशभक्ताला बदनाम करण्यासाठी तथ्य अणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अभियान मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात चालवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. जम्मू-काश्मिरात मतदारसंघाच्या परिसिमनाने काम चालणार नाही. तिथे तातडीने विधानसभेच्या निवडणुका घेण्याची मागणी गांधी यांनी केली. महिला आरक्षण कायदा लागू करण्याची तसेच महिला आरक्षणात ओबीसी आणि अन्य समुदायांच्या महिलांचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली.