किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– शून्य भंगार उपक्रमाला गती,
मुंबई, (२० डिसेंबर) – मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी एकत्रितरीत्या भंगार विक्रीतून २४८ कोटी रुपये कमावले आहेत. हीकमाई नोव्हेंबरपर्यंतची असल्याचे अधिकार्यांनी म्हटले आहे. भारतीय रेल्वेने शून्य भंगार उपक्रमाच्या अंतर्गत रेल्वे स्थानक आणि परिसरातील भंगार साहित्य विक्रीसाठी काढले आहे. यंदा भंगार विक्रीत ३४.०९ टक्के इतकी वाढ झाली आहे. वयोमर्यादा पूर्ण झालेले रेल्वे इंजिन, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेल्या दुर्घटनाग्रस्त डब्यांसह अन्य भंगाराचे वर्गीकरण करीत त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. या विक्रीतून ३०० कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी ८२ टक्के उद्दिष्ट नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेने विक्री केलेल्या भंगारातून भुसावळ विभागाला ४९ कोटी २० लाख, माटुंगा आगाराला ४० कोटी ५८ लाख, मुंबई विभागाला ३६ लाख ३९ हजार, भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेडला २३ कोटी ६७ लाख, नागपूर विभागाला २२ कोटी ३२ लाख, पुणे विभागाला २२ कोटी ३१ लाख, सोलापूर विभागाला २० कोटी ७० लाख, परळ, हाजी बंदर-शिवडी, मनमाड व करी रोड यांनी एकत्रितपणे विक्री केलेल्या भंगारातून त्यांना ३२ कोटी ९० लाखांचा महसूल मिळाला.
३०३ कोटींचा दंड
मध्य रेल्वेने २०२२ ते जून २०२३ या कालावधीत ३०३.३७ कोटींचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा यात ४१.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४६.८६ लाख प्रकरणांमधून ३०३.३७ कोटी कमावले आहेत.