किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२० डिसेंबर) – रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्यासंदर्भात बेकायदेशीर सावकारी प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील आणि आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यांना बुधवारी समन्स बजावला आहे.
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत बयाण नोंदवण्यासाठी तेजस्वी यादव यांना २२ डिसेंबरला, तर लालूप्रसाद यांना २७ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. कथित घोटाळा लालूप्रसाद संपुआच्या पहिल्या कार्यकाळात रेल्वेमंत्री असतानाचा आहे. आरोप आहे की, २००४ ते २००९ पर्यंत भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप डी पदांवर अनेक लोकांना नियुक्त करण्यात आले आणि त्या बदल्यात या लोकांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित ए. के. इन्फोसिस्टिम कंपनीला हस्तांतरित केली. ईडीने यापूर्वी एका निवेदनात दावा केला होता की, लोकांकडून जमीन घेतली तेव्हा कात्याल या कंपनीचे संचालक होते.