किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– राममंदिर लोकार्पणापूर्वी घेतला आढावा,
अयोध्या, (२० डिसेंबर) – पुढील महिन्यात अयोध्येत होणार्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी येथे येणार्या भाविकांना पुरविल्या जाणार्या सुविधांची पाहणी करण्यासाठी रेल्वे मंडळाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी बुधवारी येथील दोन स्थानकांची पाहणी केली. त्यासोबत अधिकार्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. जया वर्मा सिन्हा यांनी अयोध्या आणि रामघाट हॉल्ट रेल्वे स्थानकांची पाहणी केली आणि जवळपासच्या सर्व स्थानकांच्या स्थितीचा आढावा घेतला. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर नवीन इमारतीचे बांधकाम ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राणप्रतिष्ठेनिमित्त रेल्वेकडून दिल्या जाणार्या सुविधांबाबत उत्तर रेल्वे आणि उत्तर पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशीही चर्चा झाली आहे. विशेष गाड्या चालवण्याबाबतही चर्चा झाली आहे. २२ जानेवारीनंतर मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असल्याचे जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले. त्यांच्यासाठी अतिरिक्त गाड्या चालवण्याचा प्रस्ताव आहे. ३० डिसेंबर रोजी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पंतप्रधानांच्या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले की, चर्चा अद्याप सुरू आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर माहिती देण्यात येईल.