किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
नागपूर, (११ डिसेंबर) – कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल सुनावला असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमासमोर व्यक्त केली.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची एकात्मता राखणारे योग्य पाऊल उचलले होते, ते न्यायालयाने वैध ठरवले त्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांचे अभिनंदन करतो. जम्मू काश्मीरात आता मुक्त वातावरणात निवडणूका घेता येणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंमत दाखविली असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहे.
जम्मू-काश्मीरात आता महाराष्ट्र भवन
जम्मू-काश्मीरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भवन तयार होत आहे. त्यामुळे अनेकांना तेथे पर्यटनाला जाता येणार आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकार अतिशय गंभीर असून त्यांना वार्यावर सोडणार नाही, अशी गॅरंटी आम्ही देत आहोत, गत दीड वर्षात शासनाने सातत्याने शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेतले आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घरी बसून राज्याचा कारभार केला आहे,त्यांना शेतकर्यांचे प्रश्न कळणार नसल्याने त्यांनी आता आत्मचिंतन करावेत,अशी सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.