किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे आश्वासन,
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती,
नागपूर, (११ डिसेंबर) – गरज भासल्यास केंद्र शासन कांदा खरेदी करेल. पण, कांदा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम २८९ अन्वये सूचना मांडली. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका त्यांनी केली.
कांद्याला ४ हजार ५०० रुपये इतका भाव असताना कांदा बंदी निर्यात केल्यावर तासाभरातच तो घसरून १२०० रुपये इतका झाला. निर्यातबंदी झाल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा निर्यात बंदीचा राज्य सरकारने विरोध करायला हवा होता. मात्र, ते मुग गिळून गप्प बसले, अशा शब्दात सत्ताधार्यांवर दानवे यांनी निशाणा साधला. एकप्रकारे कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकर्यांवर केंद्र सरकारने आघात व अन्याय केला आहे. महाविकास आघाडी या शेतकर्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कांदा निर्यातबंदी बाबत सरकारला सभागृह व सभागृहाबाहेर ‘सळो की पळो’ करून सोडणार, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात नंतर सखोल चर्चा होईल व त्यावर सखोल उत्तरही दिले जाईल. मात्र, यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी मुंबईत प्राथमिक बोलणे झाले. पीयूष गोयल म्हणाले की, देशात सध्या कांदा उपलब्ध असला तरी यंदा उत्पादन कमी झाले आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा होऊन अडचण निर्माण होईल. म्हणून निर्यात बंदी करण्यात आली. मात्र, याबाबत पुढील निर्णय होईपर्यंत शेतकर्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे, असे पीयूष गोयल यांनी आश्वस्त केले आहे. कृषी व पणन मंत्री या विषयावर पुन्हा चर्चा करणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.