किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशयवतमाळ, (१२ डिसेंबर) – शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक आहेत. यवतमाळचे भाजपाचे निमंत्रक नितीन भुतडा यांनी कार्यकारी संपादक राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. राऊत यांनी ११ डिसेंबर रोजी पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याचा दावा भुतडा यांनी केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या लेखाद्वारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याचा आरोप आहे. संजय राऊत याच्याविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात कलम १५३ (अ), ५०५ (२) आणि १२४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आणि दिशाभूल करणार्या आरोपांमुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या कारणास्तव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संयोजक नितीन भुतडा यांनी संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.