किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जाणून घेणार जनतेची मते,
नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाने भाजपा आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची आपली योजना उघड केली आहे.
या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संयोजक गोपाल राय आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेतली आणि पक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. ही मोहीम १ ते २० डिसेंबर या कालावधीत चालणार आहे. केजरीवाल यांना अबकारी प्रकरणात अटक झाल्यास त्यांनी तुरुंगातून सरकार चालवावे कींवा राजीनामा द्यावा, या मुद्यावर आम्ही ‘मैं भी केजरीवाल अभियान’ राबवून लोकांमध्ये जाऊन त्यांची मते जाणून घेऊ, असे आपने म्हटले आहे. ही मोहीम २० डिसेंबरपर्यंत दिल्लीतील सर्व २६०० मतदान केंद्रांवर चालणार आहे.
या मालिकेत २१ ते २४ डिसेंबर दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सर्व २५० वॉर्डांमध्ये जनसंवाद होणार आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा भाजपा कसा कट रचत आहे, हे आम्ही लोकांना सांगू, असे गोपाल राय आणि राघव चड्ढा यांनी सांगितले.