किमान तापमान : 29.25° से.
कमाल तापमान : 29.76° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.25° से.
27.96°से. - 30.33°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– तेलंगणात काँग्रेसने उधळले स्वप्न
हैदराबाद, (०३ डिसेंबर) – केसीआर पार्टीचा अश्वमेध कुणीच रोखू शकणार नाही, या थाटात देश जिंकायला निघालेले के. चंद्रशेखर राव अर्थात् केसीआर स्वतःच्या घरात म्हणजे तेलंगणातच गारद झाले आहेत. केसीआर यांना मागील काही काळापासून पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न पडायला लागले होते. मात्र, काँग्रेसने ते उधळले आहे.
पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे केसीआर घरातच गारद होतील, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील चेवेल्ला येथील विजयसंकल्प सभेला संबोधित करताना वर्तवले होते. ते खरे ठरले आहे. भारत राष्ट्र समितीने आक्रमकपणे विस्तार सुरू केला. त्यानुसार महाराष्ट्रातही पाय रोवण्यास सुरुवात केली. पक्षविस्तारासाठी केसीआर यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या व मोठ्या प्रमाणात पैसा ओतला. महाराष्ट्रासह काही राज्यांतील विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या ते संपर्कात आहेत. महाराष्ट्रात हातपाय पसरताना त्यांनी शेतकर्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि दलित समाजासाठी राबविण्यात येणार्या ‘रयतू बंधू’ आणि ‘दलित बंधू’ या दोन योजनांचा ते सातत्याने उल्लेख करायचे. परंतु, त्यांच्या मंत्र्याने निवडणूक काळात या योजनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना या योजनेतील वितरणाची परवानगी मागे घेत दणका दिला होता.
तेलंगणा राष्ट्र समिती असे केसीआर यांच्या पक्षाचे पूर्वी नाव होते. देशपातळीवर जाण्यासाठी त्यांनी हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले. आंध्रप्रदेशमधून २०१३ मध्ये तेलंगणा वेगळा झाल्यानंतर दशकभर लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसचा कर्नाटकात विजय झाल्यानंतर केसीआर यांच्या स्वप्नाला आणखी धुमारे फुटले होते. त्यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. काँग्रेस आणि भाजपाला वगळून इतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. असाच प्रयत्न त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही केला होता. मात्र, त्यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली होती.