किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दावा केला आहे की, पक्ष पूर्ण बहुमताने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवर, ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की आमचे सेवेचे आणि सुशासनाचे सरकार, जनतेचा पूर्ण आशीर्वाद भाजपला असेल…मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल. प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, मी नेहमी म्हणत आलो की मध्य प्रदेशात भाजप प्रबळ बहुमताने सरकार स्थापन करेल… आजचा कल त्याच्या बाजूने आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ’भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’, आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. सोबत पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. या विधानसभा निवडणुकीत भाजप ३-० असा विजयी होईल, असे भाजप नेते जयवीर शेरगिल यांनी सांगितले. पक्षाचा ’विजय रथ’ मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये येणार आहे. तेलंगणात या वेळी नाही तर पुढच्या वेळी राज्यात भाजपचा झेंडा फडकणार आहे.
छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा विधानसभा निवडणुका २०२३ साठी मतमोजणी सुरू होताच, टीव्ही चॅनेल्सच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये असे दिसून आले की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. दरम्यान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे आहे. २०२४ मधील मेगा फायनलपूर्वी सेमीफायनल म्हणून लढाईच्या अंतिम टप्प्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर मी नतमस्तक: ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिक्रिया
भोपाळ – राज्यात विजय मिळवून देणार्या जनतेला मी सलाम करतो आणि यासाठी कठोर परिश्रम करणार्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर मी नतमस्तक आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्यप्रदेशात भाजपाला मिळालेल्या बहुमतानंतर व्यक्त केले आहे.
निवडणूक कल चाचण्यांचे अंदाज धुळीस मिळवत मध्यप्रदेशात भाजपाने अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवत बहुमत प्राप्त केले. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. यावेळी शिंदे म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने मेहनत घेतली आणि त्यांचे मी आभार मानतो. मध्यप्रदेशमध्ये भाजपीचे यश हे पंतप्रधानांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. सोबतच अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या धोरणांचा हा विजय आहे. मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक होतो आणि राज्यातील जनतेचे आभार मानतो.
शिवराजसिंह चौहान यांचे काम आणि त्यांची ‘लाडली बहना’ ही योजना गेम चेंजर असल्याचे सांगत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, ग्वाल्हेर आणि चंबळच्या जनतेने साथ दिली. विरोधी नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जनतेने विश्वास दाखवला नाही, त्यामुळे जनतेचे मी आभार मानतो. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न केला असता, ते म्हणाले की, मी भाजपाचा एक साधा कार्यकर्ता आहे. मी पक्षासाठी नेहमीच काम करेल.