किमान तापमान : 25.03° से.
कमाल तापमान : 25.11° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.03° से.
24.76°से. - 28.47°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.34°से. - 28.03°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.31°से. - 28.21°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.61°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.3°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.71°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलमुंबई, (०२ सप्टेंबर) – जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यासाठी सरकारला जबाबदार धरत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकानी केली आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
जालना येथे लाठीमार केल्यामुळे महिलांसह अनेक आंदोलन गंभीर जखमी झाले आहेत. गृहमंत्री फडणवीस यांचे हे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता तर शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतून देण्यात आला असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपाने कायमच पोकळ घोषणा केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचेच सरकार असताना, मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांकडून आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू असताना, आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा कू‘र प्रकार सरकारकडून केला जात आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
गृह विभागाच्या आदेशाशिवाय लाठीमार होत नाही : रोहित पवार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील ८ तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला. गृह विभागाच्या आदेशाशिवाय लाठीमार होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.