किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.59° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.53°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.54°से. - 27.92°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.47°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.11°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.83°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.33°से. - 28.71°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलबुलढाणा, (०३ सप्टेंबर) – मराठा समाज शांत संयमी प्रामाणिक आहे. जालना येथे घडलेली घटना दुर्दैवी असून काही राजकीय समाजकंटक आंदोलनात दगड फेक करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते गळा काढण्यासाठी आले होते. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही २०२४ ला युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने योग्य बाजू न माडल्याने आरक्षणाचा मुद्या सुप्रिम कोर्टात गेला. एक सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांचा जळफळाट होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आम्ही सर्व एकत्र मजबूत जोड असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्वजून सांगितले.
बुलढाणा येथे दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी मलकापूर रोडवरील कर्हाळे लेआऊटच्या भव्य प्रांगणात शासन आपल्या दारी या उपक्रमातील लाखो लाभार्थींना प्रत्यक्ष मदत देण्यासाठी जाहिर कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, संदिपान भूमरे, खा. प्रतापराव जाधव, खा. रक्षाताई खडसे कार्यक्रमाचे आयोजक आ. संजय गायकवाड, आ. संजय कुटे, आ. श्वेता महाले, आ. आकाश फुंडकर, आ. किरण सरनाईक, आ. चंद्रकांत पाटील, माजी आ. विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, सचिन देशमुख, योगेंद्र गोडे, विनोद वाघ, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, आयुक्त नारनवरे, नंदकूमार जंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक नाईकनवरे, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते, जिपो अधिक्षक सुनिल कडासने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जालना जिल्ह्यात घडलेली घटना दुर्देवी आहे.
या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रयोगानंतर संपूर्ण जगात भारताचे नावलौकिक केले आहे. त्यांचा आदर सर्वदूर जगभरात होत असल्याने विरोधक त्यांच्या या यशाने द्वेष मत्सरातून दिल्लीत मुजरा करायला जाणारे राजकीय विरोधक नरेंद्र मोदी यांच्यावर दररोज टिका करीत असल्याचे सांगून मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्यांना ऑनलाईन मदत देण्यात आली. तसेच मेहकर तालुक्यातील तलाठी कार्यालयांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रमावर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.