किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल-वर्सोवा-विरार सी-लिंक, मेट्रो ११ प्रकल्पाला मदत,
-देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत,
मुंबई, (२७ ऑगस्ट) – उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा दिवसांच्या जपान दौरा आटोपून शनिवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. मुंबईत आल्यावर प्रसन्न वाटते, अशी प्रतिकि‘या त्यांनी दिली. मुंबई विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, कृपाशंकर सिंह आणि इतर भाजपा नेते-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जपानमधील अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानसोबत जे उत्कृष्ट संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे जपान मोठ्या प्रमाणात भारताला सहकार्य करीत आहे. राज्य अतिथी म्हणून मला जपानने निमंत्रित केले होते. या दौर्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत बैठका झाल्या.
राज्यात आपण वर्सोवा-विरार सी-लिंक तयार करीत आहो, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळताच पुढची पाऊले टाकली जातील. मेट्रो ११, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला सुद्धा मदत करण्याची तयारी जपानने दर्शवली आहे. विविध प्रांतांच्या गव्हर्नर्सच्या भेटी झाल्या, ते गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत. सोनी कंपनी सुद्धा गुंतवणूक करणार आहे. जायका, जेट्रो यासार‘या कंपन्यांशीही चर्चा झाली. चांद्रयान मोहिमेच्या लॅण्डिंगसाठी मराठी बांधव मोठ्या सं‘येने जपानमध्ये एकत्रित जमले होते. त्यांच्यासोबत बसून मला हा सोहळा पाहता आला, याचा मला आनंद झाला. जणू भारत तिथे साकारला होता, असे चित्र होते. कोयासन विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट दिली, याचा खूप आनंद झाला, हा माझा नाही, तर महाराष्ट्राचा सन्मान आहे, असे फडणवीस म्हणाले.
जपान दौर्यातून काय मिळाले?
मेट्रो स्थानकांनजीकच्या भागाचा विकास
मेट्रो-३ साठी जायकाकडून वित्तसहाय्याचा चौथा-पाचवा हप्ता लवकरच
पुण्यात स्टार्ट अप हब विकसित करण्यासाठी सहकार्य
सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक
वाकायामा गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात येणार
एनटीटी डेटा आपली गुंतवणूक दुप्पट करणार, नागपूर, पुण्याला प्राधान्य
कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट