किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.62°से. - 27.77°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन,
मुंबई, (३० जानेवारी) – ज्येष्ठ मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटामध्ये रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करतांना सांगितले आहे.
अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद आहे. माझी वयाची पन्नास वर्षे इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले.
अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘धनंजय माने’ आणि सलमान खान-शाहरुख खानचा चित्रपट ‘करण अर्जुन’मधील ‘मुन्शी’ या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली. अभिनय कारकीर्दीपूर्वी अशोक सराफ भारतीय स्टेट बँकेत काम करीत होते. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. अशोक सराफ यांनी वडिलांच्या इच्छेचा मान राखला आणि नोकरी मिळवली. मात्र, त्यांना अभिनयाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्यांनी नोकरीसोबतच अभिनयाला सुरुवात केली. हळूहळू ते पूर्णपणे अभिनय विश्वाकडे वळले.
अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चिंत्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते शेंटिमेंटल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत आहेत.