किमान तापमान : 28.4° से.
कमाल तापमान : 29.22° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.4° से.
26.94°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, (१५ एप्रिल) – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदुत्ववादी होतात, तेव्हा ते ‘दार उघड बये दार…’ हे जगदंबेच्या चरणी गाणे म्हणत होते. मात्र, जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडले, त्या दिवसापासून ते ‘दार खटखटाव भाई दार खटखटाव…’ असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टीआरएस यांचे दार ठोठावतात. आता ते राहुल गांधी यांचे दार खटखटवायला जातील, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जेव्हा उद्धव ठाकरे चालत होते, तेव्हा प्रत्येक जण मातोश्रीवर जात होता. मातोश्रीचा आदर होता, पण ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या दिवसापासून त्यांना मतांसाठी दारोदारी भटकावे लागत आहे. मातोश्रीचे महत्त्व त्यांनीच कमी केले. ‘हर दर पर जो झुक जाए, उसे सर नही कहते…’ असा चिमटा आशिष शेलार यांनी काढला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौर्यावर जे बोलत आहेत, हे म्हणजे वादळ येण्यापूर्वीची भीती आहे. अमित शाह येणार म्हणजे वादळ येणार, त्यामुळे छोट्या-छोट्या बिळात राहणारे प्राणी थयथयाट करीत आहेत, असा टोलाही शेलार यांनी लगावला.