किमान तापमान : 29° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 33 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
26.88°से. - 30.7°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, (१५ एप्रिल) – एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत असताना, सेन्सॉर बोर्डाकडून मात्र मराठी चित्रपटांची गळचेपी सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून २०० पेक्षा अधिक मराठी चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असून, हा बॅकलॉग भरून काढताना बोर्डाच्या सदस्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.
भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही संस्था १९८३ पासून कार्यरत आहे. ती सेन्सॉर बोर्ड या नावाने ओळखली जाते. चित्रपटातील कंटेंट आणि भाषा यावर विचार करून निर्णय घेतला जातो. काही बदल असतील किंवा आक्षेपार्ह दृश्ये अथवा भाषा असेल तर, त्यानुसार बदल निर्माते व दिग्दर्शकांना सुचवले जातात. चित्रपट पाहून त्याच्या प्रेक्षकांचा वयोगट ठरवणे, त्यात बदल सुचवून प्रमाणपत्र द्यायचे की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाकडून घेतला जातो. आपल्या देशात प्रदर्शित होणार्या प्रत्येक चित्रपटाला या संस्थेचे प्रमाणपत्र बंधनकारक असते.
मात्र, गेल्या अडीच वर्षांत मराठी चित्रपटांचे परीक्षण जवळपास ठप्प राहिल्याने मोठा बॅकलॉग तयार झाला आहे. परिणामत: २०० हून अधिक चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्राअभावी रखडले आहेत. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सेन्सॉर सदस्यांना सलग ८ ते १२ तास चित्रपट परीक्षण करावे लागत आहे. चित्रपट अतिशय बारकाईने पाहून त्यातील आक्षेपार्ह दृश्ये, संवाद, धार्मिक तणाव वाढवणार्या प्रसंगांना कात्री लावण्याची सूचना सदस्यांना करावी लागते. मात्र, अशाप्रकारे एकाच दिवशी एकाहून अधिक चित्रपटांचे परीक्षण करावे लागत असल्याने परीक्षणाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.