किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलजिलेटिन कारप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा,
मुंबई, ११ मार्च – रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या जिलेटिन कारप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज गुरुवारी धक्कादायक खुलासा केला आहे. या कारची जबाबदारी घेण्यासाठी ज्या टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला होता, ते चॅनेल दिल्लीतील तिहार कारागृह परिसरात तयार करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिसांना याबाबत कळविण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
एका फोनमध्ये हे चॅनेल तयार करण्यात आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एका खाजगी सायबर संस्थेची मदत घेतली होती. या संस्थेने हा छडा लावला. तपासाच्या काळात या फोनचा ठावठिकाणा तिहार कारागृह परिसरातच असल्याचे दिसून आल्याचे अधिकारी म्हणाला.
अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर २५ फेबु्रवारी रोजी महिंद्र स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी टेलिग्राम चॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. याच चॅनेलवरून स्फोटके भरलेल्या कारची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. यावर जो संदेश पाठविण्यात आला होता, त्यात क्रिप्टो चलनात पैशाची मागणी करून, तो कुठे जमा करायचा, याबाबतची लिंकही पाठविण्यात आली होती. मात्र, तपासात अशी कोणतीही लिंक आढळून आली नव्हती.