किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.97°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलअन्वय नाईक आत्महत्या प्रकरण,
मुंबई, १० मार्च – अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या तपासाचे प्रकरण दाबल्याचा आरोप करून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विशेषाधिकाराचा भंग केला आहे, असे स्पष्ट करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत देशमुख यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दाखल केली.
अन्वय नाईक यांची हत्या नाही, तर आत्महत्या होती आणि त्या आत्महत्येसाठी कोणीही प्रवृत्त केल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले. हे प्रकरण दाबले असल्याचा आरोप करून देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. या आरोपाद्वारे आपल्यावर दबाव आणण्याचा व सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.
या सर्व पद्धतीने देशमुख यांनी आपल्याला कर्तव्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. हा आपल्या विशेषाधिकाराचा भंग आहे. त्यामुळे आपण हक्कभंगाची सूचना देत आहोत, असे ते म्हणाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंगाची सूचना तपासून पाहिली जाईल, असे आश्वासन दिले.
अशोक चव्हाणांवर हक्कभंग दाखल करणार
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन केले. त्यांनी काही विसंगत वक्तव्यही केले आहेत. त्यानंतर विरोधी पक्षाला बोलू द्यायचे नाही, अशा प्रकारच्या धोरणातून मराठा आरक्षणावर खोटे निवेदन चव्हाण यांनी केले आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला असता, याबाबतची सूचना दिली नसल्याचा आक्षेप सत्ताधार्यांकडून घेण्यात आला. त्यामुळे फडणवीसांनी सूचना देऊन हक्कभंग मांडतो, असे जाहीर केले.
चव्हाण यांना कल्पना नाही की, राज्यात एसीबीसीचा मराठा आरक्षण देण्याचा जो कायदा तयार केला आहे, तो १०२ व्या घटनादुरुस्तीच्या आधीचा आहे. आपण आता जुन्या कायद्यात दुरुस्ती केली आहे. महान्यायवादी वेणुगोपाल यांच्याविरोधात चव्हाण यांनी केलेले विधान अतिशय चुकीचे आहे.
राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी जो प्रस्ताव मांडला, त्याच प्रस्तावाला वेणुगोपाल यांनी पाठिंबा दिला. रोहतगी यांनी १०२ घटना दुरुस्तीचा उल्लेख केला. या दुरुस्तीचा अर्थ काढायचा असेल, तर तो सर्व राज्यांना लागू पडेल, अशी माहिती वेणूगोपाल यांनी न्यायालयात दिली. त्यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य आणि चुकीची माहिती सभागृहाला दिल्याबद्दल चव्हाण यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.