किमान तापमान : 26.76° से.
कमाल तापमान : 26.91° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.91° से.
26.72°से. - 30.93°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
रविवार, 24 नोव्हेंबर कुछ बादलजोडण्या तोडण्यावरील स्थगिती अधिवेशनापुरती, स्थगितीला राऊतांकडून केराची टोपली,
मुंबई, १० मार्च – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर वीज देयके भरू न शकलेल्या ग्राहकांच्या सुरू असलेल्या वीजतोडणीला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी तातडीने दिलेली स्थगिती आज बुधवारी अधिवेशन संपण्यापूर्वीच उठविण्यात आली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबतचे एक निवेदन विधिमंडळात करीत, ही स्थगिती उठविल्याचे जाहीर केले. राज्यातील थकबाकीदारांना सरकारने दिलेला हा मोठा ‘शॉक’ आहे.
२ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणाद्वारे वीज ग्राहकांच्या जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या अधीन राहून, थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यास पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते.
कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर राज्यात २२ मार्च २०२० पासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मार्च ते जून या कालावधीत अतिशय कडक निर्बंध होते. या कालावधीतील वीजदेयके विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार तीन महिन्यांच्या सरासरीवर देण्यात आली. राज्यातील सुमारे २.५० कोटी घरगुती ग्राहकांपैकी ६ लाख ९४ हजार ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९९ टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले.
याव्यतिरिक्त ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणद्वारे विविध सवलती व उपायोजना करण्यात आल्या. महामारीच्या कालावधीत महानिर्मिती, महापारेषण, महावितरणने अनेक नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करून वीज ग्राहकांचा पुरवठा सुरळीत ठेवला. या कालावधीत ग्राहकांच्या थकबाकीमुळे जोनवारीपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
मार्च २०२० मध्ये महावितरणची एकूण थकबाकी ५९ हजार ८३३ कोटींवरून डिसेंबरअखेर ती ७१,५०६ कोटी एवढी झाली. जानेवारीअखेर महावितरणवरील कर्ज ४६,६५९ कोटी असून, महापारेषण व वीजनिर्मिती कंपनीला एकूण १२,७०१ कोटी देणे आहे. मार्च २०१४ मधील महावितरणचा नफा ११,१४० कोटी होता. मार्च २०२० मध्ये फक्त ३२९ कोटी इतका नफा झाला. १७,७८८ कोटींचे कर्ज दुपटीने वाढून ३९,१५२ कोटींवर पोहोचले, तर थकबाकी २०,७३४ कोटींवरून ५९,८२४ कोटी इतकी झाली. राज्यात सप्टेंबर २०२० अखेर ४४.६७ लाख कृषी पंपधारकांकडे ४५ हजार ७५० कोटी एवढी थकबाकी आहे. या पृष्ठभूमीवर महावितरण व ऊर्जा क्षेत्राला ऊर्जा देण्याच्या अनुषंगाने २ मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे, असे राऊत यांनी जाहीर केले.