किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.45°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, १० मार्च – मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून काढल्याची घोषणा कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना विधान परिषदेत केली.
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात विधिमंडळात भाजपाने थेट सचिन वाझे यांना निलंबित करून, चौकशीची जोरदार मागणी लावून धरली होती. या मागणीसाठी भाजपाने दोन्ही सभागृहात सरकारला चांगलेच घेरले. शेवटी सरकारला झुकावे लागले आणि थातुरमातूर का होईना, त्यांना गुन्हेशाखेतून बाहेर करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा संपूर्ण तपास एटीएसला दिला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केले. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावे, त्याची रीतसर चौकशी केली जाईल. जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती, त्याबाबत पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री आणि माझी भेट घेतली. डेलकर यांचा मुलगा अभिनवच्या तक्रारीनुसार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.